Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्यार शेलटर ने सहा महिन्यात पंचवीस श्वानांना दिला आश्रय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीस जखमी जनावरांवर केला उपचार मोकाट जनावरांकरिता सम्राट क्लबचा मदतीचा हात आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी राजुरा - मुक्या जनावरांना सम्राट क्...
तीस जखमी जनावरांवर केला उपचार
मोकाट जनावरांकरिता सम्राट क्लबचा मदतीचा हात
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
मुक्या जनावरांना सम्राट क्लब ने मदतीचा हात दिला असून राजुरा शहरातील मोकाट जनावरे आणि इतर पशुसाठी काम करीत असलेली राजुरा प्यार शेल्टर ह्या मध्ये असलेल्या मुक्या प्राण्यांना जेवणासाठी सम्राट क्लब राजुरा चे संस्थापक सोमेश्वर आइटलावार, संचालक विशाल देवके, सुदर्शन आनाकोंडा यांनी व्यवस्था केली. आज गांधी जयंतनिमित्त जनावरांना फूड भेट देण्यात आले. यावेळी शेलटर संयोजिका कृतीका सोनटक्के, बलवंत ठाकरे, रश्मी शाहू, मिलिंद गड्डमवार, प्रतीक कावळे, रोहन कोरांगे, स्वप्नील मेकलवार, रघुनाथ बताशंकर, पंकज बुटले राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बी.यू. बोर्डेवार उपस्थित होते. यापूर्वी सुध्दा सम्राट क्लब राजुरा ने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या प्यार शेलटर मध्ये सहा महिन्यांत पंचवीस श्वानांना आश्रय दिला असून आतापर्यंत तीस मुक्या जखमी जनावरांचा उपचार करून त्यांना बरेही करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top