Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांच्या अभिवादन सोहळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे स्मृतिदिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन धरणराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर -...
श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे स्मृतिदिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
धरणराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थे द्वारा संचालित स्थानिक श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे दि.11 ऑक्टोबर 2022 रोजी  मानवतेचे महान पुजारी थोर तत्त्वचिंतक, ग्रामोद्धार आणि राष्ट्रनिर्माणाचे प्रवर्तक "ग्रामगीता"कार जेष्ठ समाजसुधारक वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन सोहळा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अनिल मुसळे सर, डॉ. राजेश डोंगरे, प्रा. करनेवार, प्रा. बोभाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. निलिमा बावणे मॅडम ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निता मुसळे यांनी केले. सदर कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या विचारांवर मान्यवारांकडून मार्गदर्शन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता गुरुदेव प्रार्थनेने करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शाळेतील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षक-शिक्षिकावृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top