Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा येथील शेकडो महिला पुरुषांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुकाध्यक्ष शरद जोगी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहे मजबुती धरणराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - ग...
कोरपना तालुकाध्यक्ष शरद जोगी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहे मजबुती
धरणराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
ग्राम पंचायत निवडणुक करिता प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना नांदा येथील अनेक महिला आणि पुरुषांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोरपना तालुका अध्यक्ष आणि गडचांदुर नगर परिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मजबुती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नांदा येथील ग्राम पंचायत निवडणुकीत शेतकरी संघटना, भाजपा, मनसे आणि गोंडवाना समर्थित ग्राम विकास आघाडी आणि काँग्रेस समर्थित शेतकरी कामगार युवा पॅनल मध्ये सरळ लढा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ने नांदा ग्राम पंचायत निवडणुकीत वॉर्ड नं ४ मधून अपर्णा अशोक क्षीरसागर, वॉर्ड ५ मधून होमराज उरकुडे आणि वॉर्ड नं. ६ मधून दिवाकर चांदेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे निवडणुकीच्या समीकरणात मोठा बदल दिसत आहे. दि. १६ ऑक्टोबर ला होणाऱ्या ऐन मतदाना पूर्वी मोठ्या संख्येत महिला आणि पुरुषांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोरपना तालुका अध्यक्ष शरद जोगी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षाला मजबुती मिळाली आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यामधे नांदा येथील कल्पना शंकर गेडाम, लीना सुनिल उपासे, स्वाती सुरेश पेंदोर, विजया दिवाकर बोपनवार, ज्योती साईनाथ मोहजे, शोभा मधुकर आस्वले, वैशाली राजु आत्राम, आरती विनोद पेंदोर, मायाबाई सोनेराव आडे, संगीता जयराम कुंभारे, माया अरुण मेश्राम, वैशाली उरकुडे, रेखा उरकुडे, मनीषा उरकुडे, सपना काळे, संदीप डे, रोशन काळे, सचिन निवलकर, श्यामसुंदर निवलकर, वसंता चेडे, उत्तम बंडीवार, नीलकमल कोल्हे, वेंकटी कोनकंटी, राहुल मल्लरप्पू, सागर मल्लरपू, प्रणित करमणकर, नागेश तोमरा, अरुण उरकुडे, सचिन उरकुडे, दिलीप उरकुडे, अक्षय राठोड, बाबू गुप्ता, वजीर, सुरेश खैरे, अशोक मेश्राम, कैलास दुर्गे आदींचा समावेश आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरपना तालुका अध्यक्ष आणि गडचांदुर नगर परिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी, प्रवीण काकडे, करण सिंग, सुनील भाऊ, हेमराज उरकुडे, दिवाकर चांदेकर अपर्णा क्षीरसागर, अशोक क्षीरसागर आदीं उपस्थित होते. शरद जोगी ने आपल्या उमेदवारांना मत देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आव्हान केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top