Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवैधरित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध घाला - डॉ.मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भाजपा शिष्टमंडळाचे निवेदन सादर आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर -         चंद्रपुर शहरातअ...
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भाजपा शिष्टमंडळाचे निवेदन सादर
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
        चंद्रपुर शहरातअवैध रित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले त्यामध्ये रहेमतनगर, भानापेठ, पठानपुरा, जटपुरा अशा विविध भागात सुगंधित तंबाखू ची विक्री मोठ्या प्रमाणात केल्या जाते त्यामुळे चंद्रपुरात मुखरोग कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या गंभीर समस्येवर आळा घातला नाही तर भविष्यात मोठ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होईल करिता अवैध रित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा यांना चंद्रपूर च्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, महानगर सचिव चांदभाई पाशा सय्यद, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, मल्लेश कोडारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top