Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलि धोपटाला प्रोजेक्ट - प्रकल्पग्रस्तांचे खासदार बाळू धानोरकर याना निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन दिवसात सीएमडी सोबत बैठक घेणार खा.बाळू धानोरकर यांचे आश्वासन आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी राजुरा - वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाला...
दोन दिवसात सीएमडी सोबत बैठक घेणार खा.बाळू धानोरकर यांचे आश्वासन
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाला प्रोजेक्ट करिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र अद्यापही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासनाप्रमाणे नोकरीतर सोडाच मोबदला सुद्धा देण्यात आला नाही. वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांनी खदानीचे काम बंद पाडून आंदोलने केलीत व निवेदने दिलीत मात्र रेंगाळलेल्या या प्रोजेक्ट मुळे प्रकल्पग्रस्त पुरते हवालदिल झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांनी आज चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन देऊन या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याचे निवेदन दिले. खासदार बाळू धानोरकर दोन दिवसात सीएमडी सोबत बैठक घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी विनोद कावळे, संतोष शेंडे, जगदीश बुटले व इतर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top