विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शिक्षक दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर तालुक्यातील वेंडली येथे ५ सप्टेंबरला वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय,वेंडली येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक तथा सावित्रीबाई फुले बहू. शिक्षण व प्रशिक्षण संस्था,भोयगावचे संस्था अध्यक्ष मारोतरावजी काकडे, माजी मुख्याध्यापक राजेंद्र विद्यालय भोयगाव, सुरेश जोगी ,तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय उपरवाहीचे मुख्याध्यापक दत्तात्रय बोंडे यांचा सत्कार विद्यालया तर्फे घेण्यात आला. सोबतच स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमा निमित्य घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा, भाषण, गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले व गावातून दानशूर व्यक्तिकडून विद्यालयास प्राप्त झालेल्या साहित्याचे उदघाटन करण्यात आले.या मंगलमय प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन वेंडली येथील सरपंच प्रतिभाताई अलवलवार यांचे हस्ते पार पडले .प्रमुख पाहुणे म्हणून सोबतच प्रमुख राजेंद्र काकडे, मालेकर गुरुजी गुरूनानक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, विरुर, माजी जिल्हा परिषद सभापती (समाज कल्याण) निळकंठराव कोरांगे, इंदुमती काकडे माजी सभापती पं.स. कोरपना, शारदाताई सुरेशराव जोगी, प्रणाली घुगुल, आशाताई पाचभाई, संजय टोगे पोलीस पाटील, गजाननराव नागपुरे अध्यक्ष तंटामुक्त समिती, वेंडली, प्रकाशराव अलवलवार, बाबाजी मुसळे, बबन पाचभाई, प्रभाकर पाचभाई, गोवर्धन पिंपळशेंडे, श्रीरंग वरारकर, प्रमोद नागपुरे, संध्याताई रणजित पिंपळशेंडे, रणजित पिंपळशेंडे, गुलाब चालूरकर, शिंदे, फुलभोगे, न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, चैतन्य गणेश मंडळ वेंडलीचे सर्व सभासद, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत पिंपळशेंडे, श्रीकृष्ण बरडे, चेतन देवाळकर,सतीश पाचभाई, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कराडे यांनी केले. कार्यक्रमासाठी संदीप पिंपळशेंडे, रुपेश चिवंडे, निलेश जोगी, सचिन किन्नाके व माजी विद्यार्थी, विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.