Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यातील शेतकरी संघटना व गोंगपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रापं वडगाव व गट ग्रापं रामपूर येथील कार्यकर्त्यांचा समावेश धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - कोरपना तालुक्यातील ग्र...
ग्रापं वडगाव व गट ग्रापं रामपूर येथील कार्यकर्त्यांचा समावेश
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील ग्रापं वडगाव व गट ग्रापं रामपूर येथील शेतकरी संघटना आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार धोटे यांनी काँग्रेस पक्षात स्वागत केले. यात पक्ष शेतकरी संघटनेचे विठ्ठल खारकर, योगेश उरकुडे, शामकांत निकोडे, नामदेव देवगडे, दादाजी किनाके, श्रीकांत निकोडे, शशिकांत निकोडे, शंकर कन्नाके, एकनाथ पाचभाई, अशोक उरकुडे, शंकर निमकर, दिपक ताजने, गजानन परसुटकर आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाचे सुरेश आत्राम, लिंगा चतकारी, सुरेश किनाके, अरजु चिकराम, नागु आडे, रामदास कन्नके, वासुदेव यडमे, सुरेश कोटनाके, जंगा किनाके, सुरेश शेडमाके, चंद्रभान किनाके यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. 
या प्रसंगी अशोक आस्कर, सुदर्शन डवरे, सुरेश मालेकर, दिगंबर लाजेकर, भास्कर तुरणकर, प्रकाश कुचनकर, शंकर मोहितकर, अनिल उरकुडे, गुलाब जीवतोडे, कैलास मेश्राम, नागोबा देवाडकर, शंकर पिंगे, तुकाराम बोकडे, चंद्रशेखर येवले, पांढरी उरकुडे, अजय लांजेकर यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top