Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे राजुऱ्यात फडकला १०० फुट उं...
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे
राजुऱ्यात फडकला १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर राजुरा येथे १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज लागावा, यासाठी स्वातंत्र्याचे ७५ वर्ष १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन जवळपास वर्षभरापूर्वीच केले होते. यानिमित्याने राष्ट्रध्वजाचा सन्मान व्हावा, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मरण व्हावे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. 
हा राष्ट्रध्वज माय लव्ह माय राजुरा या पाईंट जवळ उभारण्याचे नियोजन होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता हे ठिकाण नगर परिषद च्या लगतच्या भागात मामा तलावाजवळ ठरविण्यात आले आज मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राजुरा नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रध्वज फडकविण्यात आले. प्रसंगी शहरवासीयांची मोठय़ा संख्येत उपस्थिती होती. 
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे पुढे म्हणाले की, स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. १५ आॅगस्टसाठी लोकांमध्येही उत्साह आहे. मात्र हा उत्साह केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी पूरता मर्यादित न राहता तो कायम राहला पाहिजे. यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहभाग नोंदविला पाहिजे. असे आवाहनही केले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top