श्यामाप्रसाद मुखर्जी जण वन विकास योजने अंतर्गत सौरऊर्जाकुंपण लाभ त्वरित वाटप करण्याचे निर्देश
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
केंद्र सरकार कार्यान्वित श्यामाप्रसाद मुखर्जी जण वन विकास योजने अंतर्गत वन लगत शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून शेत मालाचे संरक्षण करणेकरिता सौरऊर्जा कुंपणाची योजना राबविली जात असताना त्या योजने अंतर्गत लाभ मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या प्रक्रियेत तत्कालीन पालकमंत्री यांनी निविदा प्रक्रियेत किरकोळ बदल केले आणि त्याबाबत चे प्रक्रिया राबविण्या बाबत चे दिशा निर्देश कायम न केल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना लाभ देण्यात दिरंगाई झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान होत असल्याची तक्रार भाजप पदाधिकाऱ्यांना मिळताच राजुरा तालुक्यातील भाजपचे शिष्ठ मंडळ थेट उपविभागीय वन अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात धडकले संबंधित विषयाचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करून उपविभागीय वन अधिकारी गर्कल साहेब 3 सप्टेंबर च्या आधी लाभार्थ्यांना लाभ वितरित होईल या अनुषंगाने गतिशील कार्यवाही करू असे अश्वासण दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या वाचनानुसार लाभ वितरित करण्यात यावा असे सांगण्यात आले.
सदर प्रसंगी शिष्ठ मंडळात माजी कृषी सभापती तथा ता अध्यक्ष भाजपा सुनील उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा मधुकर नरड, जिल्हा सचिव तथा सरपंच खामोना हरिदास झाडे, जिल्हा सदस्य भाऊराव चंदनखेडे, भाजपा नेते सुरेश रागीट, कोलगाव सरपंच पुरुषोत्तम लांडे, महादेव तपासे, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख सईद कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, महेश रेगुंडावार, अनिल खनके, अशोक झाडे, लक्ष्मण निरांजने, श्रीनिवास पांजा, सचिन बैस, राजकुमार भोगा, कैलास कार्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.