Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आ.सुधीर मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजपा राजुरा कडून आनंद उत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ.सुधीर मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजपा राजुरा कडून आनंद उत्सव साजरा महाराष्ट्र सह चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या...
आ.सुधीर मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजपा राजुरा कडून आनंद उत्सव साजरा
महाराष्ट्र सह चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात नेण्याचे काम सुधीर भाऊच्या माध्यमातून होणार - माजी आमदार अँड. संजय धोटे
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीत गेला होता लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली. आज राजभवनात शपथग्रहण कार्यक्रम संपन्न झाला. लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी राजुरा कडून माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. 
यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की, सुधीर भाऊ हे नेहमी गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम करत राहत असतात, असेच काम पुढील येणाऱ्या कार्यकाळात होईल, मागील अडीच वर्षांपासून रखडलेले विकास काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण होणार, येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र सह चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या मुख्यप्रवाहात नेण्यासाठी रखडलेले अनेक विकासाभिमुख कार्य होईल अश्या शुभेच्छा देण्यात आल्या. 
याप्रसंगी माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या सह माजी सभापती सुनिल उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजप जिल्हा सचिव वाघुजी गेडाम, जिल्हा सचिव हरिदास झाडे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, भाजपा महामंत्री प्रशांत घरोटे, माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया, माजी नगरसेविका श्रीमती उज्वला जयपूरकर, पंचायत समिती सदस्य कु नैना परचाके, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य, भाऊराव चंदनखेडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड, किरण नळे, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, कैलास कार्लेकर, जनार्धन निकोडे, संजय समर्थ, संदीप गायकवाड, राजु वाटेकर, अनिल खनके, रत्नाकर पायपरे, श्रीनिवास कोपुला, शहजाद अल्ली, तुलाराम गेडाम, सुनिल लेखराजनी, सचिन बैस, प्रशांत साळवे, पुरुषोत्तम मुजुमदार, महेश रेगुंडवार, वासुदेव झाडे, संदीप मडावी, सत्यजित शर्मा आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
09 Aug 2022

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top