विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय, विद्या मंदिर, स्कॉलर अकॅडमी गडचांदूर च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य चा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पाऊस पडत असताना सुध्दा साजरा करण्यात आला.
मुख्य ध्वजारोहण संस्थेच्या संचालिका श्रीमती उज्वलताई धोटे, यांच्या हस्ते करण्यात आले. आर.एस.पी. चे ध्वजारोहण व स्काऊट गाईड चे ध्वजारोहण प्राचार्या सौ. स्मिताताई चिताडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, संचालक रामचंद्र सोनपितरे, सत्य साई सेवा समिती चंद्रपूर च्या जयाताई मुनगंटीवार, चंद्रशेखर मुनगंटीवार, विजय मंगीलवार, प्रभारी प्राचार्य रामकृष्ण पटले, प्राचार्या रश्मी भालेराव, उपप्राचार्य विजय आकनूरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच.बी. मस्की, सेवानिवृत्त प्राचार्य प्रशांत उपलेंचवार, कृष्णा बततुलवार, बी.एस. पत्तीवार होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखित चे प्रकाशन अतिथी च्या हस्ते करण्यात आले. तसेच 65 गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. संचालन प्रशांत धाबेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मनोहर बांदरे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक, गणमान्य व्यक्ती, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.