ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यंकटेश मंदिर सभागृहात झालेल्या या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दौलत भोंगळे व प्रमुख पाहुणे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी वारकड, उपप्राचार्य राजेश खेराणी, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, माजी उपशिक्षणाधिकारी हर्षदा खेडकर, शिक्षिका रजनी ठाकुरवार, संघाचे माजी अध्यक्ष व साहित्यिक डॉ. सुरेश उपगल्लावार, संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, अॅड. विठ्ठल रागीट आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण करतांना दौलत भोंगळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विषद करताना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. सर्वच क्षेत्राप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही प्रचंड स्पर्धा आहे. त्यासाठी ज्ञान मिळविण्यासाठी सर्वकष प्रयत्नांची गरज आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी आई-वडील, गुरुजन व ज्येष्ठांचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य भोंगळे यांनी मांडले. डॉ.सुरेश उपगनलावार यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या नव्या कार्यकारिणीने समाजसेवा सुरू ठेवण्याचे काम सातत्याने करावे, असे मत व्यक्त केले. डॉ.वारकड यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व चिकाटीने मेहनत केल्यास नक्कीच यश पदरात पडते, असे सांगितले. उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांनी समाजसेवे सोबतच पर्यावरण संरक्षण काळाची गरज असल्याने प्रत्येकाची वृक्ष लावून संगोपन करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक सुदर्शन दाचेवार, संचालन हरिभाऊ डोर्लीकर व आभार भास्कर येसेकर यांनी मानले. कार्यक्रमात शुभांगी वाटेकर, स्वाती देशकर, स्वरूपा झंवर, नम्रता खोंड यांनी स्वागतपर गीत गायीले. यशस्वीतेसाठी विद्याप्रकाश कल्लूरवार, रामचंद्र मुसळे यांनी सहकार्य केले.
30 विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी उपप्राचार्य राजेश खेराणी, रजनी ठाकुरवार, हर्षदा खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. किसनराव वाटेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विजय वाटेकर यांच्याकडून इयत्ता बारावी मधील गुणवत्ता प्राप्त 17 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.