Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संविधान चौकात वाहतुकीला शिस्त घालण्याकरिता ट्राफिक सिग्नल सुरु करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संविधान चौकात वाहतुकीला शिस्त घालण्याकरिता ट्राफिक सिग्नल सुरु करा भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन विरेन्द्र पुणेक...
संविधान चौकात वाहतुकीला शिस्त घालण्याकरिता ट्राफिक सिग्नल सुरु करा
भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शहरात पंचायत समिती चौकामध्ये वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहे. मागील काही वर्षापासून हे वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत आहे. हा मार्ग आंतरराज्यांना जोडणारा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. येथून विद्याथ्र्यांना शाळेत ये-जा करावं लागतं असल्याने येथे वाहतूक नियंत्रण होणे अत्यंत गरजेचे आहे.
सदर परिसरात रस्त्यावरच वाहने उभे करणे, काळी पिवळी टॅक्सीमध्ये प्रवासी घेणे, ट्रक उभ्या करणे असे प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यामूळे वाहतूक सिग्नल पूर्ववत सुरू करून पूर्णवेळ अंमलदाराची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. करीता विद्यार्थी व नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन पंचायत समिती चौकातील सिग्नल पुर्ववत सुरू करण्यात यावे तसेच दिवसभर पूर्णवेळ वाहतूक अंमलदार नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top