Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भरदिवसा वाघाने ओलांडला महामार्ग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भरदिवसा वाघाने ओलांडला महामार्ग नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर रस्ता ओलांडताना दोन्ही कडून वाहतूक थांबली बघा व्हिडीओ आमचा विदर्भ - न्यूज नेटव...
भरदिवसा वाघाने ओलांडला महामार्ग
नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर रस्ता ओलांडताना दोन्ही कडून वाहतूक थांबली
बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी -
बुधवार दि. ६ जुलै २०२२ ला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर साईघाटा जवळ रस्ता ओलांडत असलेल्या पट्टेदार वाघाने अनेकांना भुरड घातली. पट्टेदार वाघ रस्ता ओलांडत असताना दोन्ही कडील वाहतूक थांबली होती आणि अनेकांनी रस्ता ओलांडत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढत सोशल मीडियावर पोस्ट केले. 
जिल्ह्यात घनदाट जंगल असल्याने विविध राज्य, देश-विदेशातील हजारो पर्यटक जिल्ह्यात वाघाच्या दर्शनाकरिता भ्रमंती करिता येत असतात मात्र प्रत्येकांनाच वाघाचे दर्शन होत नाही मात्र महामार्गावरच अश्या प्रकारे रस्ता ओलांडताना वाघाचे दर्शन झाल्याने अनेकांना समाधान वाटले. सायंकाळच्या सुमारास काही वाहनचालकांना वाघ रस्त्याचा कडेला दिसला अनेकांनी आपली वाहने सावकाश घेतली आणि जेव्हा वाघ रास्ता ओलांडत होता तेव्हा सर्वानी आपली वाहने थांबवली यामुळे अर्धा-पाऊण मिनिट वाहतूक थांबली होती. 
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघांचा वावर असल्याची चर्चा होती मात्र बुधवारी सायंकाळी वाघाने चक्क महामार्ग ओलांडल्याने या भागात वाघांचा वावर असल्याची पुष्टी झाली आहे, हा मार्ग चौपदरी असल्याने या मार्गावर अतिशय वेगाने वाहने जातात. या भागात वाघांचा वावर असल्याने वाघामुळे वाहन चालकांच्या जीवाला अथवा वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या तडाख्यात आल्याने वाघाचा जीवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आली आहे. मात्र अश्यातच दुचाकीने जाणाऱ्या वाहनचालकांत दहशतही निर्माण झाली आहे.

(साभार-सोशल मीडिया)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top