Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु न झाल्यास १७ तारखेपासून आमरण उपोषण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु न झाल्यास १७ तारखेपासून करणार आमरण उपोषण शेतकरी संघटनेचे नेते व नांदा ग्रामपंचायतचे माजी सदस्य रत्ना...

  • नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु न झाल्यास १७ तारखेपासून करणार आमरण उपोषण
  • शेतकरी संघटनेचे नेते व नांदा ग्रामपंचायतचे माजी सदस्य रत्नाकर चटप यांनी दिला प्रशासनाला इशारा
  • आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याविषयी मुंबई येथे दिले निवेदन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन 3 ते 4 महिने झाले आहे. परंतु अनेक वेळा मागणी करून ही अद्यापपर्यंत नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झालेले नाही. येत्या 15 दिवसात नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु न झाल्यास १७ तारखेला आमरण उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव तथा नांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रत्नाकर चटप ने प्रशासनाला दिला आहे. 
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खनिज विकास निधीतून तब्बल नऊ कोटी रुपये खर्च करून सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे भव्य बांधकाम करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतीने तीन एकर जागा ही उपलब्ध करून दिल्यानंतरच प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लागल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अथक प्रयत्न करुन प्राथमिक आरोग्य केंद्र, शासनाकडून मंजूर करवून  घेतल्याचे सांगितले.
आरोग्य विभागाच्या लेट लतीफीमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रासह महाराष्ट्रातील  एकूण जवळपास ८६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने आमदार सुभाष धोटे प्रयत्नशील असल्याची आणि लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन करणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षातर्फे दिली जात आहे.
गेल्या तीन वर्षापासून ताटकळत असलेले बांधकाम अखेर कसे बसे पूर्ण झाले. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने १५ पदाची मंजुरीही दिलेली आहे. परंतु आतापर्यंत उद्घाटनाचा मुहूर्त मात्र प्रशासनाला मिळालेला नाही आहे. याविषयी २६ एप्रिल रोजी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव तथा नांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रत्नाकर चटप यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तातडीने आरोग्य केंद्र सुरु करण्याविषयी मुंबई येथे निवेदन दिले. परंतु 15 दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु न झाल्यास १७ तारखेला आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. नांदा गावाची लोकसंख्या १० हजाराहून अधिक असून सदर प्राथमिक आरोग्य केंद्रमुळे बिबी, नोकारी, पालगाव, हिरापूर, आवारपूर, वडगाव, खिर्डी, राजुरगुडा, लालगुडा, पिंपळगाव आदी परीसरातीलतील रुग्णांना आरोग्य सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. सोबतच गडचांदुर येथील रुग्णालयावरील भार कमी झाल्यामुळे तिथेही लोकांना मुबलक जागा उपलब्ध होणार.
लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती व अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे श्रेय घेण्यासाठी सोशल माध्यमाद्वारे गावातील पुलाचे काम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याकरिता आमरण उपोषण करण्याचा इशारा देवुन येथील राजकीय तापमान चांगलेच तापण्याची शक्यता दिसत आहे. जनतेच्या समस्या निराकरणसाठी व जनतेच्या सोबत उभे असल्याचे दावे प्रतिदावे करत विरोधकांवर प्रसिद्धी मिळवण्याची होड सुरू असल्याचे आरोपही केले जात आहे. नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याकरिता आमदार सुभाष धोटे व प्रशासनास अनेकदा निवेदने देण्यात आली आहे. आमदार सुभाष धोटे यांनी प्रशासनाला निर्देश देवून तातडीने नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश लोंढे व महेश राऊत यांनी केली आहे तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे रत्नाकर चटप यांनी आमरण उपोषणाचा इशारा देऊन प्रशासनाची झोप उडवली आहे. नागरिकांच्या हिताच्या या प्रश्नाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top