आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटूक) या कामगार संघटनेने कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अहर्निश संघर्ष केला. त्यामुळे कामगारांना त्यांचे हक्क प्राप्त होऊ शकले. आता संघटनेत पुन्हा पूर्वीप्रमाणेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत येथील इंटक चे नेते आर. आर. यादव यांनी व्यक्त केले. इंटक कामगार संघटनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सास्ती ओपन कास्ट कोळसा खाणीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सध्याची संघटीत कामगारांची परिस्थिती सरकारने कामगार कायदे बदल करण्याचा प्रयत्न केल्यापासून फारशी चांगली नाही. कामगारांसाठी असलेल्या अनेक चांगल्या तरतुदींना ते मुकणार आहेत. इंटक ने कामगारांच्या हक्कासाठी अनेकदा संघर्ष केला, असे यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी आयटकचे क्षेत्रीय सचिव दिलीप कनकुलवार, बीएमएसचे क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य विवेक अल्लेवार, एचएमएसचे क्षेत्रीय कल्याण समिती सदस्यरंगराव कुळसंगे यांनी आपले विचार व्यक्त केले. संचालन इंटकचे कल्याण समिती सदस्य विजय कानकाटे व आभार क्षेत्रीय कोषाध्यक्ष नागेश मेदर यांनी मानले. यावेळी कार्याध्यक्ष सुदर्शन डोहे, अनंत एकडे, पंकज जुलमे, देवेंद्र कोलेरी, रवींद्र कावळे यांचेसह कोळसा कामगार उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.