- नप कर्मचाऱ्याच्या वारसदारांना ५० लक्ष रुपयाचा धनादेश सुपूर्द
- कोरोना काळात कर्तव्यावर असताना झाला होता मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
नगर परिषद राजूरा मध्ये कार्यरत कर्मचारी सुधाकर शंकर कोंडावार यांचा कोविड-19 कोरोना साथ रोगामध्ये कर्तव्यावर असतांना दिनांक 2 मे 2021 रोजी मृत्यू झाला होता. मृतक सुधाकर कोंडावार यांच्या पात्र वारसदारांना महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग तर्फे रुपये पन्नास लक्ष्य सानुग्रह सहायक अनुदान मंजूर करण्यात आले.
नगर परिषदेच्या सभागृहात त्यांच्या पत्नी श्रीमती संध्या सुधाकर कोंडावार यांना पन्नास लक्ष्य रुपयाचा धनादेश नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी बांधकाम सभापती आनंद दासरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार तसेच नप प्रशासकीय अधिकारी विजय जांभूळकर, अभिनंदन काळे, पाणी पुरवठा अभियंता संकेत नंदवंशी, लेखापाल अश्विन कुमार भोई, संगणक अभियंता ज्ञानेश सोनवाने, मिळकत व्यवस्थापक अक्षय सूर्यवंशी, सतीश देशमुख, वीरेंद्र धोटे, संजय जोशी, मनोज राजगडे, बाबूराव गोगुलवार व इतर नप कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.