- नगर सेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा
- यंग चांदा ब्रिगेडची मागणी; पोलिस अधिक्षक यांना निवेदन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
काँग्रेसचे माजी शहर कमेटी अध्यक्ष तथा मनपा नगर सेवक नंदु नागरकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाचा निषेद करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे युथ अध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, घूग्घूस शहर संघटक विलास वनकर, शहर संघटक करणसिंह बैस, शहर संघटक रुपेश पांडे, शहर संघटक राम जंगम आदिंची उपस्थिती होती.
सकाळी मॉर्निंग वॉक वरुन घराकडे परत येत असतांना आजाद बागेजवळ दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकांनी काँग्रेसचे नगर सेवक नंदू नागरकर यांच्यावर क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला केला. यात नंदु नागरकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे आता तिव्र पडसाद उमटत असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्याण या घटनेचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबत त्यांच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अरिवंद साळवे आणि शहर पोलिस निरिक्षक सुधाकर अंभोरे यांना निवेदनही देण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.