Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: युवकांमध्ये कटिंगच्या स्टाईलची क्रेझ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवकांमध्ये कटिंगच्या स्टाईलची क्रेझ आकर्षक व हटके दिसण्यासाठी कटिंग सोबतच दाढी वाढविण्याचीही फॅशन बघा व्हिडीओ - काय म्हणतात कटिंग सलून संचा...
  • युवकांमध्ये कटिंगच्या स्टाईलची क्रेझ
  • आकर्षक व हटके दिसण्यासाठी कटिंग सोबतच दाढी वाढविण्याचीही फॅशन
  • बघा व्हिडीओ - काय म्हणतात कटिंग सलून संचालक
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
इतरांपेक्षा सुंदर, रुबाबदार व आकर्षक दिसण्यासाठी आता तरुणांचा जास्त कल दिसून येत आहे. स्वतःचे आकर्षक आणि रुबाबदार व्यक्तिमत्व दिसण्यासाठी युवकांमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळया कटिंगच्या स्टाईल पुढे येत आहेत. त्याचबरोबर एका विशिष्ट आकाराची दाढी वाढण्याचा फंडाही पुढे येत आहे. जुन्या व पारंपरिक कटिंग करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल दिसून येत होता. परंतु, आता नवीन तरुणाईत वेगवेगळया कटिंगच्या स्टाईल प्रामुख्याने पुढे येत आहेत. जुन्या काळात मिथुन कट, संजय दत्त स्टाईल, अमिताभ बच्चन स्टाईल अशा वेगवेगळया स्टाईल होत्या. परंतु, या जुन्या वळणाला बाजूला सारत युवकांमध्ये आता वन साइड, टू साइड, सिजर कट, मिलिटरी कट, टू लाईन, हेअर स्पा, टेस्टिंग कट अशा नवीन नवीन प्रकारच्या स्टाईल पुढे येत आहेत.
आजकाल काही युवक वेगवेगळया - पक्षांची चिन्हे सुध्दा आपल्या डोक्यावर स्टेप कट कटिंग मधून करताना दिसतात. वेगवेगळया प्रकारचे जेल लावून केसांना नवीन लुक देण्यावर ही तरुणांचा भर आहे. यात व्हेक्स जेल, सेट-वेट जेल वापरून तरुण या केसांना स्टायलिस्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळया स्टाईलने कटिंग करण्यसाठी जेंट्स पार्लरमध्ये शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत असले तरी त्याची पर्वा न करता बहुतांश तरुण या नवीन स्टाईल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. काही पालक आपल्या मुलांवर अशी कटिंग का बरं केली असे म्हणत असले तरी काही पालक यावर काहीही आक्षेप घेत नसल्याने अश्या कटिंगकडे नव तरुणांचा कल वाढतच आहे. केस आकर्षक दिसण्याबरोबरच आकर्षक दाढी ठेवण्यावरही तरुणांचा कल आहे. शॉर्टकट, लॉक कट दाढी यासारख्या वेगवेगळया दाढया ठेवण्याकडे ही तरुणांचा कल दिसून येतो.
आजकल पाच वर्षापासून ते पस्तीस वर्षपर्यतच्या मुलांमध्ये वेगवेगळया स्टाईलच्या कटिंग करण्यावर भर असून दिवसातून निम्मयापेक्षा अधिक ग्राहक हे तरुण असतात. जुन्या प्रकारच्या कटिंग करण्यात आता तरुणांना रस राहिला नसून हेच तरुण आता नव्या जमान्यात नव्या स्टाईलकडे वळले आहेत. 
- वेंकटेश दरगेलवार, सीसोर्स साऊंड फॅमिली सलून राजुरा

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top