Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अव्यवस्था त्वरित दुर करा - आ. मुनगंटीवारांचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्याना पत्र
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अव्यवस्था त्वरित दुर करा - आ. मुनगंटीवारांचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्याना पत्र महानगर भाजपाचे जिल्हा...

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अव्यवस्था त्वरित दुर करा - आ. मुनगंटीवारांचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्याना पत्र
  • महानगर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असून औषध साठा मुबलक नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ही अव्यवस्था दूर करून त्वरित औषधसाठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्याना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.या संदर्भातील एक निवेदन महानगर भाजपाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून दिरंगाई झल्यास आंदोलनाचा इशारा भाजपाने दिला आहे. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महासचिव सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, डॉ. दिपक भट्टाचार्य, आलीम शेख, मोहमद जिलानी, प्रफुल राजपुरोहित, डॉ.किरण देशपांडे, 
 रहांगडाले, पि.एल.लोई, विनय कावडेकर, नितीन गुप्ता यांची उपस्थिती होती.
जिल्हा सामान्य रूग्णालयात कन्हैयालाल तिवारी हे त्यांच्या पायाच्या आजारावरील शस्त्रक्रियेकरिता वार्ड नं. 7 येथे भरती आहेत. त्यांचेवर 31 डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजीत होते. त्यांना काही औषधी बाहेरील मेडीकल मधुन आणण्याचे प्रिस्क्रीप्शन तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 30 डिसेंबरला दिले होते. सदर रूग्ण आ मुनगंटीवार यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांशी चांगला उपचार, मोफत औषधोपचार होण्याच्या दृष्टीने मदतीच्या भावनेने वारंवार दुरध्वनीद्वारे संपर्कात होते. तिवारीनीं सदर प्रिस्क्रीप्शन आ मुनगंटीवार यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांना पाठविले होते. सदर वैद्यकीय साहीत्य मेडीसीन हे रू. 1104 रूपयाचे असल्याचे जेव्हा  आ मुनगंटीवार कळले तेव्हा त्यांनी सदर साहीत्य घेवून देण्यास कार्यालयातील सहकाऱ्याना  सुचना दिल्या आणि सर्व प्रकार उघडकीस आला.
अशीच परिस्थिती अन्य वार्डातील प्रत्येक रुग्णांना येत असल्याचे दिसुन येते आहे. आयसीयु विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी, वार्डामध्ये वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना सातत्याने निदर्शनास येत आहे. या रुग्णालयातील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचा सकाळचा राऊंड झाल्यानंतर दुसऱ्या दिशवी मुख्य वैद्यकीय अधिकारी रूग्णांची तपासणी करित असतात. त्यामुळे मध्यंतरी काळात रूग्णांची तपासणी केल्या जात नाही. आर्थो सर्जरी करिता आवश्यक साहीत्य उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागत आहे. डोळयावरील शस्त्रक्रिया बंद आहे, अशा अनेक समस्या या रुग्णालयात आहे. ही गंभीर स्वरूपाची बाब आहे.त्यामुळे अव्यवस्था दूर करून औषधसाठा उपलब्ध करून द्या अशी मागणी आ मुनगंटीवार यांनी केली आहें. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास भाजपा आंदोलन करेल असा इशारा डॉ मंगेश गुलवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चे दरम्यान दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top