Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नागभीड येथील सरस्वती ज्ञान मंदिरात इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागभीड येथील सरस्वती ज्ञान मंदिरात इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या शुभहस्ते तालुकास्तरीय मोह...

  • नागभीड येथील सरस्वती ज्ञान मंदिरात इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
  • तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या शुभहस्ते तालुकास्तरीय मोहिम प्रारंभ
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
जँपनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर)  हा एक गंभीर, अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे. जँपनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर)  विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो. या आजारामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक जास्त आहे. या आजाराच्या सुरुवातीला ५ ते १५ दिवसामंध्ये लक्षणे दिसून येतात.
या लसीकरण मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे नागभीड तहसील चे तहसिलदार मनोहर चव्हाण यांच्या शुभहस्ते जिप सदस्य व सरस्वती ज्ञान मंदिर चे संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागभीडच्या संवर्ग विकास अधिकारी प्रणालीताई खोचरे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, नागभीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे, नप उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी भाजप तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, नवेगाव पांडवच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पायल आडे यांची उपस्थिती होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सदर मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकेतून डॉ. विनोद मडावी यांनी मेंदूज्वर या आजाराविषयी माहिती दिली तसेच या आजाराचे लक्षणे तसेच होणारे गंभीर परिणाम व लसीकरणामुळे होणारे फायदे सांगितले तर तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी नागभीड तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या १ ते १५ वर्षे वयोगटातील पाल्यांना या लसीचे डोज देण्याचे आवाहन केले. यावेळी वर्ग ७ वी चा विद्यार्थी दर्पण किशोर कोसे या विद्यार्थ्याला सर्वप्रथम लस देऊन तहसिलदार चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरुवातीला १ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींचे एकाच वेळेस जे.ई. लसीच्या एका डोसने लसीकरण केले जाते. त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत जे.ई. लसीचे दोन डोस, पहिला डोस वयोगट ९ ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिन्यापर्यंत दिले जातात.
या मोहीमेत देण्यात येणाऱ्या लसीचे नाव जेनवॅक असून ही लस भारत बायोटेक या संस्थेने निर्मिती केली आहे. ही लस सुरक्षित असून लस दिल्यानंतर काही बालकांमध्ये ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे, अंगावर पुरळ, किरकिर इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
यावेळी नवेगाव पांडव आरोग्य केंद्राचे कर्मचारी आरोग्य सेविका सपना खोब्रागडे, आरोग्य सेवक मदनकर, आशा वर्कर सुनीता कुर्झेकर, आशा वर्कर सपना खोब्रागडे, मदतनीस सुनीता मारभते, अंगणवाडी सेविका पल्लवी नरेश ठाकरे, नंदा गिरीधर अमृतकर यांची टीम कार्यरत होती. 
सदर कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक पराग भानारकर यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे, सहा.शिक्षक आशिष गोंडाने, राजूरकर, किरण वाडीकर, सतिश जीवतोडे, फटींग, राऊत यांची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top