Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण ; राज्यात कोरोनाचा आकडा वाढतोय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण राज्यात कोरोनाचा आकडा वाढतोय आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स मुंबई - राज्यातील कोरोनाचा आकडा हा 10 ह...


  • 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण
  • राज्यात कोरोनाचा आकडा वाढतोय
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
राज्यातील कोरोनाचा आकडा हा 10 हजारांकडे वाटचाल करत आहे. सध्या राज्यात 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. तसेच ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर नियम कठोर करू, तारतम्य बाळगा, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
राज्यात 8,067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 5,428 रुग्णांची नोंद झाली आहे. तर ओमायक्रॉनचे आतापर्यंत 454 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. अनेक ठिकाणी मास्क वापरला जात नाही, असे दिसून येत आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी गर्दी होत असून कोरोना खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे तारतम्य बाळगून वागा, असा इशारा देण्यात आला आहे.  रुग्णांची संख्या वाढत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील असाही इशारा देण्यात आला आहे. 
विधीमंडळात कोरोना
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यातील 10 मंत्री तसेच 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली असून, आणखी रुग्ण वाढले तर कठोर निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या 24 तासात 8000 नवे कोरोना रुग्ण
राज्यात गेल्या 24 तासात 8067 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 1,766 जणांना काल रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. गेल्या 24 तासात आढळलेल्या रुग्णांपैकी 5631 रुग्ण एकटा मुंबईत आढळले आहेत. गुरुवारच्या आकडेवाडीचा विचार केला असता, गुरुवारी 3671 रुग्ण आढळले होते. त्याचे प्रमाण आता दोन पटीने वाढल्याचे दिसत आहे. तर शुक्रवारी दिवसभरात चार नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी येथे गेल्या 24 तासात 34 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

यशोमती ठाकुर यांना कोरोना
महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ठाकुर यांनी स्वत: आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

सौरभ गांगुली कोरोना मुक्त
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आढळले होते. उपचारासाठी त्यांना कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारी त्यांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देखील देण्यात आली आहे.

देशात आढळले 22,775 रुग्ण
2021 च्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला देशात कोरोनाचे 22,775 रुग्ण आढळले आहेत. तर 406 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 1.04 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचे 1502 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 74 रुग्ण तामिळनाडू राज्यात सापडले आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top