Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रक्तदान आणि निःशुल्क एचआयव्ही, सिकलसेल तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्तदान आणि निःशुल्क एचआयव्ही, सिकलसेल तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 83 विद्यार्थ्यांनी केली एचआयव्ही, सिकलसेल, रक्तगट तपासणी 52 रक्तदा...
  • रक्तदान आणि निःशुल्क एचआयव्ही, सिकलसेल तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
  • 83 विद्यार्थ्यांनी केली एचआयव्ही, सिकलसेल, रक्तगट तपासणी
  • 52 रक्तदात्यांची केले रक्तदान
  • लोकनेते प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आरोग्य शिबिराचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे लोकनेते प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या आवारात भव्य रक्तदान आणि मोफत एचआय, सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन 18 डिसेंबर 2021 ला सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. 
या रक्तदान शिबिरात एकूण 52 रक्तदात्यानी रक्तदान करून एक मानवीय कार्य पार पाडले, सोबतच 83 विद्यार्थ्यांनी एचआयव्ही, सिकलसेल, रक्तगट अश्या विविध तपासण्यासुद्धा केल्या गेल्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याबाबत सावध असले पाहिजे आणि एड्स सारख्या भयानक रोगाची चाचणी वेळोवेळी करून स्वतःचे आरोग्य जपून समाजात जागरूकता निर्माण केली पाहिजे यासाठी रासेयो पथकाने रक्तदान शिबिरासोबतच आरोग्य तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन केलेले होते.
या शिबिरात संग्रहित झालेले रक्त चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीला देण्यात आले त्यातून अनेक गरजूंना रक्ताचा पुरवठा करता येईल. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला एचडीएफसी बँक राजुरा तर्फे चंद्रकांत राम सलामे, HDFC बँक ब्रँच ऑपरेशन व्यवस्थापका द्वारे टिफिन बॉक्स देऊन गौरव करण्यात आला. 
दरवर्षी 19 डिसेंबर ला लोकनेते प्रभाकरराव मामुलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते. या शिबिरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य विद्यार्थी, माजी विद्यार्थी सुद्धा रक्तदान केले,
रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक गरजूं रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही आणि त्यामुळे अनेकांना रक्त न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो, एकाही रुग्णाचा रक्ताच्या कमतरतेमुळे जीव जाता कामा नये ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक युवकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत.
रक्त गोळा करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढी चे रक्त संक्रमण अधिकारी डॉ हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली जय पचारे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, अमोल जिड्डेवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संतोष दातरवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सचिन निगम अधिपरीचारक, सहाय्यक म्हणून अभिलाष, रुपेश घुमे ही पूर्ण टीम होती.
एचआयव्ही आणि सिकलसेल तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र येथील समुपदेशक कु. पल्लवी पिपरिकर, लॅब टेक्निशियन कु. रश्मी बोरकर, सिकलसेल टेक्निशियन कु. शुभांगी गेडाम यांनी उपस्थित राहून तपासणी केली.
यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे पदाधिकारी अविनाश जाधव सचिव, साजिद बियाबानी संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ खेरानी, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.गुरुदास बलकी, डॉ.साबळे, डॉ.राजेंद्र मुद्दमवार, डॉ.रायपुरे, प्रा. मलिक तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 
18 Dec 2021

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top