Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विग्नोज राजूरकर यांचे हृदयविकाराने निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - शिवसेनेचे माजी राजुरा तालुका प्रमुख विग्नोज विष्णू राजूरकर वय ३४ वर्षे यांचे आज दि १२ रोज शुक्रवारला...




























आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शिवसेनेचे माजी राजुरा तालुका प्रमुख विग्नोज विष्णू राजूरकर वय ३४ वर्षे यांचे आज दि १२ रोज शुक्रवारला रात्री २ वाजताच्या सुमारास कान्हाळगाव येथे त्यांचे सासरे विजू मसे यांचे घरी निधन झाले. 
अगदी कमी वयात राजकीय क्षेत्रात नावलौकीक झालेल्या विग्नोज यांना सामाजिक कार्यात आवड असल्याने त्यांनी मराठा सेवा संघात जिल्हास्तरावर काम केले त्यानंतर शिवसेनेचे राजुरा तालुका प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. अल्पावधीत जिल्ह्यात नावलौकीक झालेला विग्नोज हृदयविकाराच्या झटक्याने काळाच्या पडद्याआळ झाला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, आई, वडील, भाऊ व आप्त राजूरकर परिवार असून राजूरकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
त्यांचेवर त्यांचे मूळ गाव पेल्लोरा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी शोकसभेला काँग्रेस ओबीसी विभाग सेलचे प्रदेश सरचिटणीस उत्तम धांडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सरिताताई कुडे, सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक सुभाष मसे, मुख्याध्यापक मनोज पावडे, रामपूरच्या सरपंच वंदनाताई गौरकार, सेवानिवृत्त प्राचार्य जोगी, शेतकरी संघटनेचे अरुण नवले, माजी सरपंच रमेश कुडे, नामदेव गौरकार, सास्तीचे नरसिंग मादर उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top