आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
पेल्लोरा येथील आपल्या शेतातून कापूस वेचून गोळा करून बैलबंडीने धिडसी येथे निघालेल्या एका शेतकऱ्याच्या बैलबंडी व मोटारसायकल मध्ये झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 21 च्या सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत नामदेव उरकुडे वय 26 हे आपल्या पेल्लोरा येथील शेतातून वेचलेल्या कापसाला बंडीवर भरून धिडशी कडे जात असतांना सायंकाळी 6.30 वाजताच्या समोरून येणाऱ्या एका मोटारसायकल क्र. MH34 AJ 6170 सोबत समोरून धडक झाली यात दुर्गापूर येथून कामावरून येत असताना राजुरा तालुक्यातील मारडा (लहान) येथील मोटारसायकलस्वार महेश अनिल पिंपळकर वय 21 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलस्वार महेशला बैलबंडी खालून लोकांनी काढले. या धडकेत एका बैल सुद्धा जखमी झाला.
महेश पिंपळकर यांची शेती वेकोलिने अधिग्रहीत केल्याने नुकतेच वेकोलि मार्फत दुर्गापूर येथे त्यांचे नोकरी पूर्व एक महिन्याचे प्रशिक्षण (व्हिटीसी) सुरु होते. महेश हा एकुलता असून नुकतीच त्यांला वेकोलिमध्ये नोकरी लागली होती. दुर्गावर येथून प्रशिक्षण करून घरी येत असतांना धिडशी गावाबाहेर संतोष सपाट यांच्या गोठ्याजवळ शेतातून कापसाचे गाठोडे वाहून आणणाऱ्या बैलबंडीला जोरदार धडक दिली यात महेश हा जागीच मरण पावला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.