- १३ दिवसापासून आठ जणांचे अन्न त्याग उपोषण सुरूच
- दालमिया सिमेंट कंपनीसमोर मनसेचे आंदोलन
- कामगारांना न्याय मिळाल्या शिवाय शांत बसणार नाही - सचिन भोयर यांची पत्रकार परिषदेत माहिती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारांडा येथील दालमिया सिमेंट कंपनीसमोर कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलना संबंधी शासनाकडून रीतसर परवानगी घेऊन स्थानिक तालुका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देत संबंधित सर्व मंत्री व प्रशासकीय अधिकारी यांना प्रतिलिप पाठवण्यात आल्या मात्र आठ दिवसाचा कालावधी लोटूनही कोणत्याही प्रकारचे निराकरण न झाल्याने शेवटी कामगार वर्गाच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात आले. पूर्वाश्रमीची मुरली सिमेंट कंपनी डबघाईला आल्यानंतर त्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांच्या व्यथा न्यायालयाच्या दालनात पोहोचल्या याच कालावधीत भारत दालमिया ग्रुपने कंपनी टेकओव्हर केल्याने कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या न्यायालयाने सुद्धा कामगाराच्या बाजूनेच निर्णय देत आशेचा एक किरण दाखवला. कंपनीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरी सुद्धा पगार मात्र अन्यायग्रस्त राहिले. अनेकांचे रोजगार गेले, जमिनी गेल्याने कामगारांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे कामगारांनी कामगार सेनेचा पाठिंबा घेत आंदोलनाला सुरुवात केली. सतत तेरा दिवसापासून धरणे आंदोलन सुरु असूनही तालुका प्रशासन वा कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून च हालचाली न झाल्यामुळे शिवाय पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन मोडीत काढण्यासाठी झालेले विविध प्रयत्न कामगारांना दिल्या गेलेल्या धमक्या यामुळे सर्व कामगारांनी कुटुंबासमवेत आमरण उपोषणाची तयारी दर्शवित आज पासून जुन्या आठ कंत्राटी कामगारांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आतातरी कंपनी व्यवस्थापनाला जाग येईल काय? न्यायालयाच्या माध्यमातून कंपनीला सुरुवात होताच या ठिकाणी पूर्वाश्रमीचे जे कामगार काम करीत होते त्यांना भर दिला जाईल त्यांचे थकित वेतन टप्प्याटप्प्याने दिले जाईल त्यांच्या जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत त्यांना रोजगार मिळेल कंपनीच्या विविध सोयी सुविधा कामगारांना लाग राहील असा निकाल असताना सुद्धा भारत दालमिया कंपनीच्या माध्यमातून आस्थापने मध्ये काम करण्यासाठी परराज्यातून कामगारांचा भरणा केला जात आहे दुसऱ्या जिल्ह्यातुन कामगार या ठिकाणी येऊ लागले पूर्वी काम करत असलेला कामगार मात्र कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलनच करीत राहिला आंदोलकांच्या मागण्यावर आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी जिल्हाभरातील नेत्यांनी या ठिकाणी कामगार संघ स्थापन केले व स्वताची तिजोरी भरून पसार सुद्धा झाले मात्र कामगार वाऱ्यावरच राहिला शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील कामगारांना घेऊन आंदोलन सुरू केले आता याकडे दालमिया व्यवस्थापनाची काय भूमिका असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.