- पहिल्याच दिवशी १२ शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणले कापूस
- कापसाला ६५२१ रुपये देण्यात आला भाव
राजुरा -
राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी येथील विनायका कॉटन इंडस्ट्रीज मध्ये कापूस खरेदीची सुरुवात विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. तालुक्यातील जेष्ठ प्रतिष्ठित व्यापारी श्री नारायणप्रसादजी झंवर यांच्या हस्ते मशनरीज चे पूजन करून व जिनिंग मध्ये कापूस घेऊन येणाऱ्या १२ शेतकऱ्यांना गंधक लावून स्वागत करण्यात आले.
विजयादशमीच्या मुहूर्तावर कापूस घेऊन येणारे आर्वी येथील बालाजी महाकुलकर, सुनील मुसळे, यादव कुंभे, अजय माथनकर, मारोती शेंडे, पुरुषोत्तम माथनकर, शालिक पारखी, संजय तलांडे, मोरेश्वर माथानकर, देव राजभर, येरगव्हाण येथील प्रज्वल डोहे, गणेश कुरसंगे इत्यादी शेतकऱ्यांना संचालकांकडून गौरविण्यात आले. शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाला ६५२१ रुपये भाव देण्यात आला. यावेळी विनायका कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक पांडुरंग चिल्लावार, गोपाल झंवर, रमेश झंवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.