Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार मनोहर चंद्रिकापुरे व माजी आमदार पाशा पटेल उद्या गडचांदूरात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समृद्ध शेतीसाठी शेतीचा नवीन पर्यायावर करणार मार्गदर्शन गडचांदूरात उद्या शेतकरी संवाद मेळावा धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदू...
  • समृद्ध शेतीसाठी शेतीचा नवीन पर्यायावर करणार मार्गदर्शन
  • गडचांदूरात उद्या शेतकरी संवाद मेळावा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
खरीप हंगामावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. यातच शेतीवरील खर्च ही सर्वात मोठी बाब आज बनली आहे. अशाही स्थितीत उत्‍तम नियोजन, इच्‍छाशक्‍ती असल्‍यास सर्व काही शक्‍य होते. मात्र मागील काही वर्षात बदलते हवामान, वाढते तापमान व शेतकऱ्यांच्या परंपरागत शेती उत्पादनात होत असलेली घट ही बाब शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढवणारी व आर्थिक कर्जाचा बोझा वाढविणारी आहे. कर्जाचा आर्थिक बोझा वाढल्याने व बदलत्या हवामानाने शेतीविषयक समस्या एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. यासोबतच प्रदूषण, अतिवृष्टी, दुष्काळ अशा अनंत संकटात शेतकरी आपली शेती परंपरागत पद्धतीने करत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मंदावत आहे. बदलत्या हवामाना बरोबर यांत्रिकी - तांत्रिक व गरजेचे उत्पादन पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी राखली तरच शेतकरी समर्थपणे टिकू शकतो. या सर्व बाबी शेतकऱ्यांना माहित व्हाव्या याकरिता गुरुवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक बालाजी सेलिब्रेशन हाल येथे शेतकरी चळवळीचे नेते अभ्यासक कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल व महाराष्ट्र विधान मंडळ रोजगार हमी योजना समिती अध्यक्ष तथा आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, बांबू रिसर्च सेंटरचे संचालक संजीव करपे, सिंधुदुर्ग शेतकरी चळवळीचे नेते शेतकरी कायदेतज्ञ अँड. संजय धोटे, सामाजिक कार्यकर्ते आबीद अली यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला शेती समृद्धीचा नवीन पर्याय, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हवामानातील बदल, उत्पादन घटामूळे शेतकऱ्यां पुढील आवाहन यावर होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अँड. श्रीनिवास मुसळे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरपना तालुका अध्यक्ष सोहेल अली, शरद जोगी, शंकर ठावरी यांनी केले आहे.  







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top