- योग्य उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
राजुरा -
राजुरा तालुका कृषी विभागातर्फे गुलाबी बोंड अळी शंभर टक्के नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मखपल्ले, उपसरपंच चेतन जयपूरकर, कृषीसेवक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगदी पीक असल्याने आणि या भागातील जमीन कपाशीच्या पिकासाठी अनुकूल असल्याने या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. मात्र बोंडअळी मुळे यापुर्वी शेतकर्यांच्या कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच पुन्हा याही वर्षी पुन्हा बोंडअळी काही भागात आल्याच्या माहितीने येथील शेतकऱ्यांवर भीतीचे सावट पसरले आहे. पिकाच्या नव्वद दिवसांच्या आत जर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला तर पुन्हा मागच्या सारखी गंभीर परिस्थिती येणार असल्याच्या कल्पनेने शेतकरी घाबरून गेले आहेत. बीटी कॉटन वर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत नसला तरी काही भागात नॉन बीटी कापसाच्या पिकावर बोंडअळी आली आहे. काही शेतकर्यांनी बीटी व नॉन बीटी कापसाची एकत्र लागवड केल्याने काही भागात दोन्ही कडे बोंडअळी दिसत आहे. म्हणुन शेतकऱ्यांनी बोंडअळी आल्यास घाबरून न जाता योग्य ती उपाययोजना करावी, यासाठी राजुरा तालुका कृषी विभागाने पुढाकार घेऊन टेंबुरवाही, पांढरपौनी, साखरवाही व बोडगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले.
टेंबुरवाही येथील सभेत बोलतांना तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मखपल्ले म्हणाले की, रसायनिक खते व औषधे वापर करतानाच सोबत जैविक खते व औषध यांचा वापर करावा आणि शक्यतो रासायनिक खते व औषधे कमी प्रमाणात वापरावी. शेतकर्यांनी शेतीचे व्यवस्थित नियोजन करून त्यात वेगवेगळी पिके घेण्याची पद्धत, फळ लागवड, शेतीची मशागत याविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता घाबरून जाऊ नये. सध्या गुलाबी बोंडआळीचे प्रमाण काही भागातच परंतु अत्यल्प असून आतापासून आपण काय उपाय केला पाहिजे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन विठ्ठल मखपल्ले यांनी केले.
या मार्गदर्शन शिबिराला उपसरपंच चेतन जयपुरकर, देवाडा मंडळ कृषी अधिकारी चेतन चव्हाण, कृषी पर्यवेक्षक नितीन कांबळे, भेंडाळा कृषीसेवक चुने, कृषी सहाय्यक काळे, गणेश चुनडे व नीता कुळसंगे, स्थानिक नागरिक कुडीराम नेवारे, अशोक अमृतकर, दादाजी निमकर, हरी निमकर, रामदास कावळे, लक्ष्मण नेवारे, उमेश मडावी, सुमन साळवे, बळीराम बोबडे, शंकर बावणे, आनंद आदे, केशव बोबडे यांच्यासह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.