- राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे समर्थ बुथ अभियान आढावा संपन्न
राजुरा -
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश तर्फे जिल्हातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील समर्थ बुथ अभियान राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या, त्या अनुषंगाने राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे समर्थ बुथ अभियान आढावा बैठक राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
विरुर स्टेशन येथे समर्थ बुथ अभियानाची आढावा बैठक माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली,यावेळी पेज प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,व संयोजक यांना या अभियाना संदर्भात यांची माहिती देण्यात आली,प्रत्येक बुथ वर 1+30 व तसेच वाटसफ ग्रुप बनविणे,ऍप्स संयोजक बनविणे,पेज प्रमुख बनविणे तसेच केंद्र सरकारच्या योजनेची माहिती प्रत्येक बुथ वर देने, तसेच आगामी निवडणूक संदर्भात यावेळी देण्यात आली,यावेळी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की गावातील प्रत्येक बुथ वर समर्थ बुथ अभियान राबविण्या करिता सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी सहकार्य करण्याची गरज असून, आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यांचा फायदा पक्षाला होणार असून तरी सर्व कार्यकर्त्यानी समर्थ बुथ राबवावे अश्या बोलताना सूचना माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केल्या,
याप्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्यासह भाजपचे जेष्ठ नेते सतीश कोमरपल्लीवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजपचे शहर अध्यक्ष भीमराव पाला, भाजपा ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष शंकर धनवलकर, भाजपा सचिव शामराव कस्तुरवार, सोशल मीडिया तालुका संयोजक हितेश गाडगे, ग्रामपंचायत सदस्य मोतीराम दोबलवार, ग्रामपंचायत सदस्य सौ मायाबाई मेश्राम, महिला आघाडी अध्यक्ष भारती मेश्राम, वैशाली वडस्कर, अनिता जीवतोडे, केशव जीवतोडे, भास्कर ताजने, गुलाब चहारे, सत्यपाल दुर्गे, चंद्रसागर दोरखंडे, सुरेश आत्राम, सौ करुणा मेश्राम मॅडम, अरुणा ताकसांडे, सौ सविता चांदेकर मॅडम, संजय मोरे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.