- बोडखा व साखरवाही येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश
- जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात युवा कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरूच
राजुरा -
हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात शिवसंपर्क अभियान जोमाने सुरु आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यात शिवसेना युवकांची पहिली पसंती बनत आहे. राजुरा तालुक्यातील साखरी, अहेरी नंतर आता बोडखा व साखरवाही येथे झालेल्या संपर्क अभियानात शेकडो युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या सर्व युवकांचे शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी शिवबंधन बांधून व गळ्यात भगवा दुपट्टा टाकून प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत केले.
शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये गणेश परसुटकर, निखिल बोरकुटे, रविंद्र लोहे, सुरज ढेंगरे, विनोद ढेंगरे, मनोज आगलावे, प्रमोद डवरे, सचिन बोरकुटे, संदिप आत्राम, स्वप्निल परसुटकर, स्वप्निल बोरकुटे, अनिल बोरकुटे, रितेश वैरागडे, अरविंद बोरकुटे, मोहन जगताप सोबतच शेकडो कार्यकर्ते शिवबंधनात बंधले. याप्रसंगी युवासेनेचे तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना उपतालुका प्रमुख गणेश चोथले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यात गावोगावी शिवसेना आपले पाळेमुले मजबूत करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.