गडचांदूर -
औद्योगिक नगरी नांदा येथे ३२२ नागरिकांचे लसीकरण पार पडले. लसीकरणाकरिता महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. नांदा ग्रामपंचायतीकडून सांस्कृतिक हॉलमध्ये लसीकरणाकरीता आलेल्या सर्व नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. भवनाचे बाजुला अंबुजा फाऊंडेशनकडून पडदा लावून ५० नागरिक बसतील अशी सुव्यवस्था करून देण्यात आली. नांदा येथील लसीकरणाबाबत वृत्तपत्रांतून येथील समस्या बाबत सातत्याने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. आज लसीकरणाचे ठिकाणी नायब तहसीलदार यांनी भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे, सौ. वीणाताई मालेकर यांनीही लसीकरण केंद्राला भेट देत येथील समस्या जाणून घेऊन आरोग्य विभागाला सुचना दिल्या. आजचे लसीकरण उत्साहीत वातावरणात व्यवस्थितपणे पार पडले असून ३२२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले लसीकरणा करिता महिलांची लक्षणीय उपस्थिती होती १८० महिलांना आज लसीकरण करण्यात आले आरोग्य विभागाच्या चमूने उत्कृष्ट कार्य केले असून नांदा ग्रामपंचायतीचे कर्मचारी व आशावर्कर यांनीही आजचे लसीकरणात मोलाचे सहकार्य, नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधला. नांदा येथे नियमित लसीचा पुरवठा करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे यांनी आरोग्य विभागाला केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.