Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे यांच्या निवेदनाची वेकोलिने घेतली दखल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोवरी कॉलनीतील नाल्या साफसफाई, कचराकुंडी, झुडपे छाटने व नवीन पाईप लाईनच्या कामाला सुरुवात आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - विकास कामे...
  • गोवरी कॉलनीतील नाल्या साफसफाई, कचराकुंडी, झुडपे छाटने व नवीन पाईप लाईनच्या कामाला सुरुवात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
विकास कामे हि फक्त निवेदने देऊन होत नसतात तर त्याकरिता वेळोवेळी पाठपुरावाही करावा लागतो. गावात व गोवरी कॉलनी परिसरात नाल्या साफसफाई होत नव्हत्या, कचराकुंडीतुन नियमित कचऱ्याचे निचरा होत नव्हता, पावसाळ्यामुळे झुडपी वाढली होती, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जागोजागी तुटफूट झाली होती त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गोवरी गावाच्या कर्तव्यदक्ष सरपंच आशाताई बबन उरकुडे यांना ही बाब माहित होताच त्यांनी तातडीने शिवसेना विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे, ग्रापं सदस्य सौ. नीलम कोसूरकर, भीमराव मीटूवार, माजी ग्रापं सदस्य अमोल कोसुरकर यांना सोबत घेऊन वेकोलि उपक्षेत्रीय व्यवस्थापक श्री प्रसाद साहेब यांना सदर कामाचे निवेदन देत तात्काळ हि कामे करण्याच्या सूचना दिल्या. शिवसेना विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांच्या उग्र स्वभावाबद्दल वेकोलि प्रशासनाला आगोदरच सर्व माहित असल्याने त्यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत गोवरी कॉलनीतील नाल्या साफसफाई, कचराकुंडी, झुडपे छाटने व नवीन पाईप लाईनच्या कामाला सुरुवात केली. 








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top