- जनरेटरचा विषारी वायू गळतीने एकाच संपूर्ण कुटुंब उध्वस्त
- दुर्गापुरातील मन हेलावून टाकणारी घटना
- वाचा सविस्तर......
दुर्गापूर (चंद्रपूर) -
दुर्गापूर गावातील ११ केव्हीच्या ट्रान्स्फार्मरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही घरातील जनरेटर सुरु राहिल्याने विषारी वायुगळती होऊन एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आज मंगळवारी सकाळी हि घटना उघडीस आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सोमवार १२ जुलैला शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली यात दुर्गापुरातील ट्रान्स्फार्ममध्ये बिघाड आल्याने काही परिसरातील वीज पुरवठा ठप्प झाला होता. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहणारे लष्कर कुटुंबाच्या घरी मोठा मुलगा अजय याचा विवाह समारोह नुकताच पार पडला होता, त्यांनी आपल्या सुनबाई ला दोन दिवस आधीच घरी आणले होते. मात्र अचानक परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने रमेश लष्कर यांनी जनरेटर लावला. मात्र जनरेटरच कुटुंबाचा घात करेल अशी साधी कल्पनाही कुणाला नव्हती. मुलाच्या लग्नाचा आनंद त्या कुटुंबात होता, मात्र तो आनंद १२ जुलैच्या रात्री दुःखात बदलला. रात्री जनरेटरमध्ये बिघाड आल्याने विषारी वायूगळतीने कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. मृतकांमध्ये रमेश मारोती लष्कर वय ४५, मोठा मुलगा अजय रमेश लष्कर वय २१, नवविवाहित सून माधुरी अजय लष्कर वय २०, पूजा लष्कर वय १४, लखन लष्कर वय १०, कृष्णा लष्कर वय ८ यांचा समावेश आहे तर दासू रमेश लष्कर वय ४० यांचेवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
रमेश लष्कर हे कंत्राटदार होते. लष्कर कुटुंब नेहमी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान उठायचे मात्र मंगळवारी कुटुंबातील कुणीही बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी दार ठोठावले असता कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा तोडत आत प्रवेश केला असता घरात सर्व धुर पसरला होता. शेजाऱ्यांनी सर्वाना बाहेर काढले व रुग्णालयात नेले मात्र कुटुंबातील ६ जणांचा आधीच मृत्यू झाला होता. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात मोठ्या मुलाचा विवाह झाला होता. सोमवारी लष्कर कुटुंबांनी नवविवाहित माधुरी लष्कर ला घरी आणले होते.
घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर व दुर्गापूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी भेट देत पाहणी केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर व दुर्गापूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी भेट देत पाहणी केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
बातम्या अधिक आहेत......
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.