- गांज्यासह पांढऱ्या रंगाची इंडिका विस्टा कार असा साढे चार लाखाचा मुद्देमाल जप्त
- बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई
- हिंगनघाट, चंद्रपूर येथील आरोपी अटकेत
सविस्तर वृत्त असे की, दि. 6 जून 2021 रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस शिपाई अजय यांना मुखबिर कडून गुप्त माहिती मिळाली की, तेलंगणा राज्यातून राजुरा-बामणी मार्गे चंद्रपूर येथे वाहन क्र. MH-34-AA-5607 या कारने गांजाची वाहतुक करण्यात येणार आहे. पोलिसांनी बामणी परिसरात सापोनि गायकवाड, मुलाणी, Pro.Psi गिरीश व स्टाफ ह्यांनी सापळा रचून बामणी टी पॉइंट ते राजुरा रोडवर असलेल्या प्रिन्स हॉटेल जवळ धाड टाकली असता उल्लेखित कार आढळून आली. त्या कारची तपासणी केली असतात त्यात खालील प्रमाणे मुद्देमाल आढळला व पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीं नामे माधव मामिड वय 32 रा.चंद्रपूर, राहुल गुळघाने वय 23 रा. भुरकोणी, हिंगणघाट, जि.वर्धा, चांदाबाई झाडे वय 55 रा. रयतवारी कॉलनी, याना ताब्यात घेतले.
सदर कारवाई सपोनि एस.ठाकरे, विकास गायकवाड, रामिझ मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्ने, तिवारी, गिरीश, पोहवा रणविजय ठाकूर, आनंद परचाके, Npc सुधाकर वरघने, शरद कूडे, बाबा नेताम, राकेश, पो.शी. अजय हेडवू, श्रीनिवास वाभितकर, दिलीप आदे, शेखर माथणकर महिला पोलिस संध्या आमटे, सीमा पोरेते यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.