Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रासायनिक खताचे वाढलेले दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे - प्रदिप बोबडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दरवाढ मागे घ्या आपची मागणी अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - शेतकरी वाचवा देश वाचवा, कापुस पिकावर गेल्या तीन वर्षांपासून ...

  • दरवाढ मागे घ्या आपची मागणी
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
शेतकरी वाचवा देश वाचवा, कापुस पिकावर गेल्या तीन वर्षांपासून बोंडअळी येवुन कापुस पिकाचे 50 ते 60% नुकसान झाल नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी वैतागला त्यातच कोरोनाने 2020, 2021 मध्ये कोणालाही सोडलं नाही. शेतकरी कूटुंबातील कर्ते पुरुष मरण पावले, शेतकरी संकटात सापडला. गावा गावात कोरोना आजारा आला. त्या संकटांना तोंड देऊन शेतकरी पुढील येनार्या हंगामाची वाट पाहत आहे. त्यातच आलेली बातमी वाचली रासायनिक खताची दरवाढ शेतकरी याना चिंतेची बाब आहे. शेतकर्याच्या मानगुटीवर बसनारी रासायनिक खताची दरवाढ म्हजेच 'पुणे लुटून सातारा दान करणे' होय. खताच्या किंमती दुपटीने वाढवून करोडो रुपये कमवून शेतकऱ्यांना भिकेला लावायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजारांची भीक देऊन त्या भिकेला सन्मान हे नाव द्यायचे. ह्या धूर्त काव्यालाच म्हणतात 'पुणे लुटून सातारा दान करणे' यामुळे शेतकरी आत्महत्या वाढणार आहे. शेतकर्याचा सरकारने विचार करून खताची दरवाढ थांबवावी. असे निवेदन शेतकर्याच्या वतीने आम आदमी पार्टीचे राजुरा विधानसभा संयोजक प्रदिप बोबडे यांनी जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, सचिव संतोष दोरखंडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, संगठन प्रमुख परमजित सिंग झगडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. सदर मागणी पूर्ण करुन शेतकर्याना दिलासा द्यावा असे आम आदमी पार्टीचे रोशन येवले, मिलिंद गड्मवार, स्वप्निल कोहपरे, पवन ताकसांडे, अरविंद वांढरे, मारोती पूरी, गोविंद गोरे, सुनिल राठोड, प्रतिक डाखरे, ऋषी वासेकर निवेदनात म्हटले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. बी बीयानांचे भाव वाढवता.खताचे भाव वाढवता.मग उत्पादन खर्चावर आधारित भाव कां दिलेल्या जात नाही ? केंद्र सरकार याबाबत ठाम भूमिका कां घेत नाही ? शेतक-यांचे खरे दुखणे हेच आहे.

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top