- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण
राजुरा -
पंचायत समिती कोरपना अंतर्गत येणाऱ्या गावात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू रहावे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. त्यामुळे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पावले उचलली जावित अशा सुचना आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच यासंदर्भात विभागास येणाऱ्या अडचणी, ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या अडचणी सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सन २०२०-२०२१ या वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकरी पात्र लाभार्थी चंद्रकला मोतीराम तोडासे राहणार कोठोडा (बु.) तसेच सविता मंगेश तिखट राहणार निमनी यांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी उपसभापती सिंधुताई आस्वले, जिप सदस्य कल्पनाताई पेचे, जिप सदस्य विनाताई मालेकर, जिप सदस्य शिवचंद्र काळे, माजी उपसभापती संभा पाटील कोवे, माजी जि.प. सदस्य उत्तमराव पेचे, सुरेश मालेकर, प्रा.आशिष देरकर, स.नि.यो. अध्यक्ष प्रा.उमेश राजुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, दक्षता समिती सदस्य विलास मडावी, अभय मुनोत, नायक तहसिलदार चिडे, सहयक उपअभियंता दराडे, सहभियांता विद्युत विभाग इंदूरकर, कोरपना तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्राम सेवक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.