Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तेलंगणातील आसिफाबाद, करिमनगर आणि आदिलाबाद येथील हॉस्पिटल्स चंद्रपूर जिल्‍हयातील रूग्‍णांसाठी उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने पुढाकार घ्‍यावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुधीर मुनगंटीवार यांची आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांच्‍याकडे मागणी मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्‍हयातील वाढ...

  • आ. सुधीर मुनगंटीवार यांची आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांच्‍याकडे मागणी

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्‍हयातील वाढती कोरोना रूग्‍ण संख्‍या व वाढता मृत्‍युदर लक्षात घेता ज्‍या आरोग्‍य विषयक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत त्‍यावर मात करण्‍यासाठी शेजारच्‍या तेलंगणा राज्‍यातील आसिफाबाद, करिमनगर आणि आदिलाबाद या ठिकाणचे हॉस्‍पीटल्‍स चंद्रपूर जिल्‍हयातील रूग्‍णांसाठी उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी तेलंगणा सरकारशी चर्चा करावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी वित्‍तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्‍हयात कोरोना रूग्‍णांची संख्‍या वेगाने वाढत आहे. या ठिकाणी सा-या व्‍यवस्‍था कोलमडुन गेल्‍या आहेत. इंजेक्‍शन्‍स मिळत नसुन आवश्‍यक इंजेक्‍शन्‍सची टंचाई निर्माण झाली आहे. बेडस् उपलब्‍ध नाही, पेशंटना दवाखान्‍याबाहेर चोवीस – चोवीस तास बाहेर उभे राहावे लागत आहे, खाजगी दवाखान्‍यांमध्‍ये सुध्‍दा बेडस् उपलब्‍ध्‍ा नाही. एकुणच चिंताजनक अवस्‍था निर्माण झाली आहे. म़त्‍युदर वाढत चालला असुन जिल्‍हा प्रशासन व आरोग्‍य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

शेजारच्‍या तेलंगणा राज्‍यात चंद्रपूरहून 65 किमीवर आसिफाबाद, 110 किमी अंतरावर आदिलाबाद व 150 किमी अंतरावर करिमनगर ही जिल्‍हा मुख्‍यालय आहेत. याठिकाणी रूग्‍णसंख्‍या अतिशय कमी असल्‍यामुळे सदर हॉस्‍पीटलमध्‍ये मोठया प्रमाणावर बेडस् उपलब्‍ध आहेत, डॉक्‍टर्स व आरोग्‍य कर्मचारी उपलब्‍ध आहेत. ऑक्‍सीजनची पाईपलाईन उपलब्‍ध आहे, रेमिडीसीवीर इंजेक्‍श्‍न वगळता अन्‍य सर्व आरोग्‍य सुविधा या ठिकाणी उपलब्‍ध आहे. याठिकाणचे हॉस्‍पीटल्‍स चंद्रपूर जिल्‍हयातील रूग्‍णांसाठी उपलब्‍ध झाल्‍यास कोरोना आटोक्‍यात येण्‍यास मोठी मदत होईल. यासंदर्भात तेलंगणाचे वित्‍तमंत्री श्री. हरीश राव यांचेशी मी चर्चा केली असुन महाराष्‍ट्र सरकारकडुन याबाबत प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यास सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याबाबत त्‍यांनी आश्‍वस्‍त केले आहे. तिन महीन्‍यांपुर्वी 36 रूग्‍णवाहीका चंद्रपूर जिल्‍हयासाठी विकत घेतल्‍या आहेत. त्‍यामाध्‍यमातुन किंवा वातानुकुलीत बसेसच्‍या माध्‍यमातुन रूग्‍णांना त्‍याठिकाणी पाठविता येवू शकेल. याद़ष्‍टीने नियमातील तरतुदी तपासुन तेलंगणा सरकारशी सामंजस्‍य करार करावा व या राज्‍यातील करिमनगर, आसिफाबाद व आदिलाबाद येथील हॉस्‍पीटल चंद्रपूर जिल्‍हयासाठी उपलब्‍ध करावे, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांच्‍याकडे केली आहे. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top