- बिलाचे पैसे न देण्यासाठी चुकीच्या अफवा पसरवित असल्याच्या कोव्हिडालयाचा आरोप
- वाचा सविस्तर कुठे घडला हा धक्कादायक प्रकार
मृत घोषित करण्यात आलेल्या महिलेचे नाव आशा चंद्रभान मून वय ६३, रा. काशीनगर, रामेश्वरी मार्ग असे आहे. आशा मून यांची ९ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास प्रकृती खालावली. त्यामुळे तत्काळ त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्या इस्पितळात कोव्हिड सेंटर असल्यामुळे रुग्णाजवळ नातेवाईकांना थांबू देण्यात येत नव्हते. दरम्यान, शनिवारी सकाळी ८.३० वाजता आशा यांचा मुलगा अजय याला इस्पितळातून फोन आला. तुमच्याकडील रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. ही बातमी ऐकताच अजय आणि काही नातेवाईक इस्पितळात पोहोचले. तिथे त्यांना रुग्णाचे मृत्यू प्रमाणपत्र सोपविण्यात आले. मृतकाची ओळख पटविण्याकरीता शरीरावरील दागिने दाखविण्यात आले. ते पाहताच दागिनी आई आशा यांचे नसल्याचे मुलगा अजयने सांगितले. त्यानुसार अजय यांनी संबंधित डॉक्टरांना मृतकाचा चेहरा दाखविण्याची विनंती केली. मृतकाचा चेहरा पाहताच त्या आशा मून नसल्याचे स्पष्ट झाले. लागलीच कोव्हिड वॉर्डमध्ये जाऊन पाहिले असता आशा मून या जीवंत असल्याचे दिसून आले. हा संपूर्ण प्रकार मून कुटुंबीयांसाठी धक्कादायक आणि तितकाच संतापजनक होता. या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देत इस्पितळाच्या हलगर्जीपणाबाबत योग्य कारवाईची मागणी केली आहे. हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर मून यांना छत्रपती चौकातील न्युक्लिअस हॉस्पिटलला हलविण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.