Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अटक टाळण्यासाठी आरोपी नियोजन अधिकारी जी.पुलय्या यांची जिल्हा सत्र न्यायालयात धाव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील आशा घटे आत्महत्या प्रकरण अनिल गंपावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील क्ष...

  • वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील आशा घटे आत्महत्या प्रकरण
अनिल गंपावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -

वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पुलय्या यांच्या उर्मट वागणुकीमुळे आशा घटे या 19 वर्षीय प्रकल्पग्रस्त तरूणीने  आत्महत्या केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या आत्महत्या प्रकरणी जी.पुलय्या या अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवूत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आजूनपावतो तो पोलिसांच्या हाती लागला नाही आहे. दरम्यान अटक टाळण्यासाठी पुलय्या यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. परंतु तपास अधिकारी यांनी मात्र या संदर्भात माहित नसल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणी न्यायालयात कधी सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेकोली बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कोळसा खाणीत असंख्य प्रकल्पग्रस्तांची नोकरी च्या नावाखाली क्रूर थट्टा करण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी. पुलय्या हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची अरेरावी ने व्यवहार करीत असल्याचा आरोप होत आहे. प्रकल्पग्रस्तांशी अपमानास्पद बोलणे, त्यांच्यावर चिडणे, कागदपत्रांसाठी मानसिक त्रास देणे आदी प्रकारामुळे शेतकरी त्रस्त असल्याचे समोर आले आहे. दरम्यान साखरी येथील आशा घटे या 19 वर्षीय प्रकल्पग्रस्त तरुणी नोकरी संदर्भात विचारपुस करण्याकरीता नियोजन अधिकारी पुलय्या यांच्याकडे गेली असता त्या अधिकाऱ्यांनी शिवीगाळ करीत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. अपमानास्पद वागणूक असह्य झाल्यामुळे आशा घाटे या तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. अखेर वडील तुळशीराम घटे यांच्या तक्रारी नंतर पुलय्या यांच्यावर आत्महत्यतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल करून आठवडा लोटला आहे पण आजूनपावतो पुलय्या ला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी ढिलाई दिल्यामुळे आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. आता पोलिसांची अटक टाळण्यासाठी पुलय्या यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्याची माहीती आहे पण तपास अधिकाऱ्यांनी या बाबत काहीही माहित नसल्याचे म्हटले आहे. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top