Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जीवनात धडपड विसरून समाजकार्यात झोकून देणाऱ्या महिलांचे कार्य मोलाचे - जेसी अनुप गांधी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
JCI राजुरा प्राईड द्वारे जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव सामाजिक कार्यकर्त्या कृतिका सोनटक्के यांना JCI भूषण पुरस्कार अनिल गंपाव...

  • JCI राजुरा प्राईड द्वारे जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव
  • सामाजिक कार्यकर्त्या कृतिका सोनटक्के यांना JCI भूषण पुरस्कार
अनिल गंपावार - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक, सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार JCI राजुरा प्राईड द्वारे करण्यात आला. यावर्षी पासून आता प्रत्येक वर्षी महिला दिनी तालुक्यातील कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजात वावरणाऱ्या गरजुंना आपली मदत व्हावी यासाठी सदैव धडपड करणाऱ्या महिलांना आपल्या कार्यात प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे असे प्रतिपादन JCI राजुरा प्राईड चे नवनियुक्त अध्यक्ष अंकुशसिंग चौहान यांनी केले. यावेळी झोन १३ चे अध्यक्ष जेसी अनुप गांधी, झोन उपाध्यक्ष जेसी संजय गुप्ता, अक्षय तुगनाईट, जेसीआय इंडिया चे व्यवसाय आणि डिजिटल नेटवर्किंग कमिटीचे सदस्य जेसी मेघनाथ जानी, JCI राजुरा प्राईडचे संस्थापक अध्यक्ष जेसी श्रीगोपाल सारडा प्रामुख्याने उपस्थित होते. 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एनिमल केयर सेंटर मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क कोचिंग क्लासेस चालवून योग्य विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या, वेळोवेळी विद्यार्थ्यांना निःशुल्क शैक्षणिक साहित्य देणाऱ्या, स्टार फाउंडेशन ला दरमहिन्याला आर्थिक मदत किंवा वस्तुरूपात मदत करणाऱ्या शिक्षिका सौ. कृतिका सुरेश सोनटक्के मॅडम यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व JCI भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

"जीवनात धडपड विसरून समाजकार्यात झोकून देणाऱ्या महिलांचे कार्य मोलाचे" असे मत झोन १३ चे अध्यक्ष जेसी अनुप गांधी यांनी व्यक्त केले. यावेळी प्राईडचे माजी अध्यक्ष दीपक शर्मा, व्यंकटेश गड्डम, संदीप खोके, दिलीप निमकर, सरिता मालू, राजेश जयस्वाल, डॉ. रमेश मंडल, शंकर झंवर, सतीश कुचनकर, सुषमा शुक्ला, स्वतंत्रकुमार शुक्ला व शेकडो महिला उपस्थित होत्या. संचालन जेसी श्वेता जयस्वाल तर आभार जेसी जहीर लखानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता JCI राजुरा प्राईडच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top