Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्रित्व व पुरूषत्वाच्या पलीकडे माणूस बनावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर शिरिषा साठे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - लोकशाही जी...

  • महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर शिरिषा साठे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
लोकशाही जीवनशैलीमध्ये महिलांकरता वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत, या कायद्यामागची कारणे प्रत्येकाची अंतःप्रेरणा बनावी तसेच सर्वांनी स्त्रीत्व पुरुषत्व या संकल्पने  पलीकडे जाऊन माणूस बनण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर शिरिषा साठे यांनी व्यक्त केले

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. या कार्यशाळेत पुण्याहून डॉक्टर शिरिषा साठे यांनी झूममिटींगद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. साठे यांनी पुढे सांगितले की महिलांनी जाणून आव्हाने स्विकारावी.  2021 च्या जागतिक महिला दिनाचं ब्रीद वाक्य देखील ‘चुझ टु चॅलेंज’ हे आहे. त्याअनुषंगाने लिंग समभाव आणि महिलांचं यश साजरा करायला आपण सर्वांनी शिकले पाहिजे. या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व कर्तुत्ववान महिला आणि त्यांच्या कर्तृत्वात समर्पण भावनेने योगदान देणाऱ्या सर्व पुरुषांनी 2021 या महिला दिनाच्या निमित्ताने चेंज एजंट म्हणून काम करावे आणि आपल्यामधील दोन त्रुटींचा आत्मपरीक्षण करून वर्षभरामध्ये त्या त्रुटी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत डॉ. साठे यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेत उपस्थितांचे आभार ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी व्यक्त केले. सदर कार्यशाळेला जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांचेसह जिल्ह्यातील सुमारे चोवीस कार्यालयातून साडेतीनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top