चंद्रपूर -
जिल्ह्यात सर्व पात्र नागरिकांना कोरोना लस वेळेवर मिळावी व लसीकरणकेंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून उद्या दिनांक 10 मार्चपासून जिल्हा प्रशासनातर्फे कोविड लसीकरणासाठी 18 नवीन केंद्र सुरू करण्यात येत आहेत.
नवीन केंद्रात ब्रह्मपुरी ब्लॉक मध्ये अरहेर नवरगाव, मुडझा, मेंडकी व चौगान पीएचसी, चंद्रपूर ब्लॉकमध्ये चिचपल्ली पीएचसी, गोंडपिपरी ब्लॉक मध्ये तोहेगाव पीएचसी, कोरपना ब्लॉकमध्ये मांडवा व नारंडा पीएचसी, मुल ब्लॉकमध्ये चिरोली पीएचसी, नागभीड ब्लॉकमध्ये नवेगाव पांडव व वाढोना पीएचसी, पोंभुर्णा ब्लॉकमध्ये नवेगाव मोरे पीएचसी, सावली ब्लॉकमध्ये अंतरगाव व बोथली पीएचसी, सिंदेवाही ब्लॉकमध्ये मोहाडी नलेश्वर पीएचसी व वासेरा पीएचसी तसेच वरोरा ब्लॉकमध्ये सावरी पीएचसी अंतर्गत शेहाण बुजुर्ग व कोसारसर पीएचसी अंतर्गत आयुर्वेदिक दवाखाना टेंभुर्डा या 18 ठिकाणी कोरोना लसीकरणे केंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.