Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्ह्यात 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरोरा येथे सर्वाधिक 37 कोरोना बाधीत ॲक्टीव पॉझिटिव्ह 323 आतापर्यंत 22,953 जणांची कोरोनावर मात मागील 24 तासात 16 जणांनी केली कोरोनावर मात श्र...

  • वरोरा येथे सर्वाधिक 37 कोरोना बाधीत
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 323
  • आतापर्यंत 22,953 जणांची कोरोनावर मात
  • मागील 24 तासात 16 जणांनी केली कोरोनावर मात
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात मागील 24 तासात 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 674 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 953 झाली आहे. सध्या 323 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 14 हजार 752 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 89 हजार 116 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 398 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 70 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 15, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपूर तीन, भद्रावती चार, ब्रम्हपुरी एक, मुल पाच, राजुरा एक, चिमूर एक व येथील वरोरा 37 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top