Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कामगार कर्मचारी सुरक्षित लाखोंचे नुकसान रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील कोट्यवधी रुपये खर...

  • कामगार कर्मचारी सुरक्षित
  • लाखोंचे नुकसान
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले बांबू प्रोजेक्ट आज आकस्मिक आग लागल्याने धाराशाही झाला. अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या प्रोजेक्टमध्ये शेकडो लोकांना रोजगार मिळणार होता पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रोजेक्टला आग लागल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान तर झालेच पण यावर शेकडो लोकांचा रोजगार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या बांबू प्रोजेक्ट ला आग लागली कशी? की यामागे काही षडयंत्र आहे हे चौकशीतून समोर येईलच पण या घटनेमुळे बांबू प्रोजेक्ट व्यवस्थापणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास येत आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top