राजुरा -
जिवती तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्यांची कामे महाराष्ट्र - तेलंगणा (तत्कालीन आंध्रप्रदेश) राज्य सीमा प्रश्नांमुळे अडकून पडलेल्या स्थितीत आहेत. येथील विकासकामे पूर्ण करण्यासाठी, सदर क्षेत्रातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी कुंभराम भीम असिफाबाद येथील कलेक्टर राहुल राज तसेच जिल्हा वनसंरक्षक शांताराम जी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यात या १४ गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यात चिखली ते लेंडीगुडा रस्ता, महाराजगुडा ते मुकदमगुडा परमडोली रस्ता, महाराजगुडा ते जंगूदेवी रस्ता, कुंभेझरी ते नारायणगुडा या रस्त्यांच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी सिताराम कोडापे, रामदास गोविंद रनवे, सहाय्यक वनरक्षक कोडापे, अभियंता मिश्रा सर, बंडू पतंगे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.