Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर थाळी वाजवुन दिले निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एसडीओ मार्फत शासनाला दिले निवेदन मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चिमूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने विविध मागण्या पूर्ण कर...

  • एसडीओ मार्फत शासनाला दिले निवेदन
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -

राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर थाळी वाजवा आंदोलन करीत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांनी निवेदन स्वीकारले तसेच उपविभागीय अधिकारी मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून जातिनिहाय करण्यात यावी, मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध नसून ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणातून देण्यात येऊ नये, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे, महाज्योती संस्थेस एक हजार कोटीचे अनुदान देण्यात यावे ओबीसी समाजाचा रिक्त अनुशेष पूर्ण भरण्यात यावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण लागू करण्यात यावे राज्यातील सर्व जिल्ह्यात ओबीसी कार्यालय सुरू करण्यात यावे एससी एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीवर योजना लागू करण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात नमूद होत्या.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली समनव्यक डॉ. अशोक जीवतोडे व महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने हुतात्मा स्मारक चिमूर येथून थाळी वाजवा आंदोलनास सुरवात होऊन मुख्य मार्गाने येत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांनी निवेदन स्वीकारले. तसेच एसडीओ यांचे मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. या थाळी वाजवा आंदोलनात गजानन अगडे, प्रकाश झाडे, राजू लोणारे, ईश्वर डुकरे, अरुण लोहकरे, पंस सभापती लता पिसे, पंस सदस्य भावना बावनकर, नगरसेविका उषा हिवरकर, नरेंद्र राजूरकर, कीर्ती रोकडे, किशोर मुंगले, कवडू लोहकरे, हरीश पिसे आदी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top