- त्या वाघाला जेरबंद करा - शिवसेनेच्या वतीने वनविभागाला निवेदन
- दोन दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे आश्वासन
- जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, धनंजय छाजेड, बबन ऊरकुडे, नगरसेवक राजु डोहे यांची उपस्थिती
राजूरा -
राजुरा तालुक्यातील राजुरा व विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला असून वाघाच्या हल्यात आतापर्यंत १० शेतकरी, शेतमजुरांना आपले प्राण मुखावे लागले आहे. वाघाच्या हल्याने शेतकऱ्यांत जबर भीती निर्माण झाली असून आता शेतात कामे कशी करायची असा प्रश्न नगरसेवक राजु डोहे यांनी वनविभागाला केला आहे.
निरंतर होत असलेल्या वाघाच्या हमल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुका राजुरा तर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांना वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले कि, वनविभाग वाघाला पकडण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून लवकरच त्याला जेरबंद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय छाजेड, माजी उपजिल्हा प्रमुख बबन ऊरकुडे, नगरसेवक राजु डोहे, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रनित अहिरकर, विधानसभा संघटक नरसिंग मादर, शहर प्रमुख अक्षय गोरे, निलेश गंपावार, उमेश गोरे, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना उपतालुका प्रमुख बंटी मालेकर, आसिफ शेख, स्वप्नील मोहुर्ले, मोनु सुर्यवंशी, समीर शेख, आकाश बकाने, मंगीचे उपसरपंच वासुदेव चापले, सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, वसिम अन्सारी, नबी पठान, मंगेश दुर्गे, बाळू कुईटे, महिला उपजिल्हा प्रमुख सरिताताई कुडे, वर्षा पंदिलवार, उपतालुका प्रमुख दिपाली बकाने, विभाग प्रमुख कलावती ईदुरवार, विभाग प्रमुख सुनिता जगदाळे, आदिवासी उपतालुका प्रमुख पार्वतीबाई तलांडे, शकुंतला क्षिरसागर, आशाताई ऊरकुडे व शेकडो महिला कार्यकर्त्या, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.













टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.