- उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
गोंदिया -
राज्यात गेल्या काही दिवसांत महिला, तरुणी व बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी आज शुक्रवार ९ ऑक्टोबर रोजी भाजपा महिला मोर्चातर्फे शहरात निदर्शने करून महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागिय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राज्यात गंभीर झाला आहे. कोरोना केंद्रातही अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.मात्र या असंवेदनशिल राज्यसरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. भाजप कार्यालयातुन महिला कार्यकर्त्यानी हातात निषेध नोंदविणारे फलक व झेंडे घेऊन घोषणाबाजी करीत उपविभागीय कार्यालय गाठले. यावेळी जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, प्रदेश सचिव संजय पुराम व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अनिल खडतकर यांना निवेदन सोपविण्यात आले. निवेदन देतांना सीता रहांगडाले, शुभांगी मेंढे, सविता पुराम, जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, शालिनी डोंगरे, प्रतिभा परिहार, तामेश्वरी बघेले, कविता रंगारी, नगरसेविका मैथुला बिसेन, अॅड. हेमलता पतेह, वर्षा खरोले, प्रमिला सिंद्रामे, प्रतिभा भेंडरकर, रिता बागडे, मधू अग्रवाल, प्रीती बन्सोड, अर्चना डोंगरे, उषा निमजे, गोल्डी गावंडे, गुड्डू कारडा, सतीश मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.