Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: अपघातात मृत्यू झालेल्या गणेशच्या वडिलांना दिले एयरटेल बँक ने पाच लाखाचा धनादेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फक्त पाचशे रुपये देऊन एयरटेल बँकेत उघडले होते नवीन खाते पंस सभापती मुमताज अब्दुल जावेद यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश प्रदान अविनाश रामटेके...

  • फक्त पाचशे रुपये देऊन एयरटेल बँकेत उघडले होते नवीन खाते
  • पंस सभापती मुमताज अब्दुल जावेद यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश प्रदान
अविनाश रामटेके - प्रतिनिधी
विरुर स्टेशन -

आज शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रत्येक व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे असा शासनाचा मानस आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात बँकेसमोर उभ्या असलेल्या रांगा दिसून येतात. म्हणूनच विवीध कंपन्यांनी या क्षेत्रात उतरतांना आपण बघत आहोत. त्यातच एयरटेल पेमेंट बँकेनी विरुरात ग्रामीण सेवा केंद्र शाखा सुरू केले आहे. त्यामध्ये राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील गणेश विलास अंगलवार यांनी आठ महिन्यांपूर्वी एयरतेल बॅंकेत आपले खाते उघडले होते पण दिनांक 7 जुलै 2020 ला आपल्या दुचाकीने चंद्रपूर वरून गावाकडे परत येत असतांना राजुरा येथे पिकअप वाहनाने त्याला धडक दिली त्यामुळे गणेश चा जागीच मृत्यू झाला होता. 

वडील शेतकरी असल्याने त्यांच्यावर मोठं संकट ओढवलं. एयरटेल बँकेनी गणेशचे त्यांच्या बँकेत इन्शुरन्स खाते सुरू असल्याने विलास अंगलवार यांना  तात्काळ पाच लाखाचा धनादेश पंचायत समितीच्या सभापती मुमताज अब्दुल जावेद यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी झोनल प्रबंधक दिग्विजय, टीम लीडर अजय भंडारी, अजय रेड्डी व राहुल सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. एयरटेल पेमेंट बँकेच्या या पारदर्शक व्यवहारामुळे आता परिसरात या बँकविषयी सहानभूती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top